"जैतुनबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
.
जैतुनबी नंतर [[नाना पाटील]] यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्याजवळच्या उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंदात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता.
 
==कीर्तनकार जैतुनबी==
स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जैतुनबी माळेगावला आईवडिलांकडेच होत्या. तोपर्यंत अध्यात्माची खोली त्यांच्या लक्षात आली होती आणि वारकरी संप्रदायाची ताकद समजली होती. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथावाचलेली व एकनाथी भागवत मुखोद्गत केलेल्या जैतुनबी सुरेख कीर्तन करू लागल्या.. गुरू हनुमानदासांबरोबर वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी मरेपर्यंत कायम ठेवला.
 
वारीत मुक्कामाच्या ठिकाणी करत असलेल्या कीर्तनाने वयाच्या चोविशीतच जैतुनबींच्या नावाने दिंडी ओळखली जाऊ लागली आणि हनुमानदासांनीही दिंडीचा सर्व कारभार त्यांच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे सुरुवातीला पालखीत महात्मा गांधींचा फोटो ठेऊन त्या वारीत सहभागी होत.
 
आषाढी आणि कातिर्की दोन्ही वार्‍या करणारी जैतुनबींची दिंडी सासवडपासून वारीसाठी प्रस्थान ठेवत असे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चाले.. कीर्तन करता यावे यासाठी दिंडी मुख्य वारीत सामील होत नसे. जैतुनबींच्या कीर्तनाला मोठी गर्दी असे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पांढर्‍याशुभ्र कपड्यात कमरेला शेला गुंडाळून उभ्या राहिल्यानंतर जैतुनबी खणखणीत आवाजात कीर्तन करत. त्यांचे कीर्तन कर्मकांडात अडकत नसे. कीर्तनात सामाजिक आशय असे. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्यात भाष्य असे. स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असे.
 
==मुस्लिम धर्माचरण==
जैतुनबी स्वत: मुस्लिम धर्माप्रमाणे आचार पाळतात. पैगंबर मानतात. नमाज पढतात. रोजे करतात. पण पैगंबर आणि विठ्ठल यांत भेद करत नाहीत. ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ही उक्ती त्यांनी कृतीत आणली आहे.
.
 
==समाजकार्य आणि निधन==
"https://mr.wikipedia.org/wiki/जैतुनबी" पासून हुडकले