"चिमूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७६:
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. [[तुकडोजी महाराज|राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या]] आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांनी [[बर्लिन]] रेडिओवरून जगाला कळविले होते.
 
==मोर्चा आणि गोळीबार==
'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत [[तुकडोजी महाराज]] होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
 
==ऐतिहासिक घटना==
चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदीप्यमान इतिहास सांगते.