"कृ.पं. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे (जन्म : वाडे, खेड तालु...
(काही फरक नाही)

१२:५९, ४ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे (जन्म : वाडे, खेड तालुका-पुणे जिल्हा, ३ एप्रिल, इ.स. १९४१) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाडे गावात, माध्यमिक राजगुरुनगरला आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात स.प.महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे झाले. ते एम.ए. बी.एड. पीएच.डी. असून त्यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात ३१ वर्षे अध्यापक म्हणून काम करून, १९९७ मध्ये निवृत्ती घेतली..

कृ.पं. देशपांडे यांचे लेखन

देशपांडे यांनी इ.स. १९६२ पासून लिहायला सुरुवात केली. आजवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र-लेखन, संशोधनात्मक लेखन, शैक्षणिक लेखन आणि कुमार वाङ्‌मय या सर्व प्रकारांत संपादन व लेखन केले आहे.


(अपूर्ण)