"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६१२:
 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. [[पी.एम.टी.]] (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व [[पी.सी.एम.टी.]] (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
 
==पुणे रेल्वे स्टेशन==
पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्‌घाटन मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्‌घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे सएशनच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीनच आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे.
 
पुणे रेल्वे स्टेशनला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यासारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहेत (इ.स. २०१५ सालची स्थिती).
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले