"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८५:
== पत्रव्यवहार ==
* तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणार्‍या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्‍तांना, मित्रांना लिहिलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या [[सुनीता देशपांडे]] यांना लिहिलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहिलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल( जी.एं.चे अंतरंग मित्र), [[म.द. हातकणंगलेकर]], कवी [[ग्रेस]], [[जयवंत दळवी]] अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते.
* जीए आणि अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार ’एका धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे.जी.एंचे पत्रसाहित्य वाचणे हा उच्च प्रतीचा आनंद आहेच, शिवाय तो पुढील पिढ्यांच्या वाङ्‌मयीन अभ्यासाठी उपयुक्त आणि मोलाचा आहे. हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
 
==आठवणी==