"संजीव गलांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
डॉ. गलांडे यांच्या संशोधनाचा उपयोग संसर्गजन्य रोग व कर्करोग यांच्यामागची कारणे समजावून घेताना होईल असे वाटते. त्यांच्या प्रयोगशाळेने एपिजेनेटिक्सचे संशोधन करताना यीस्ट, ड्रॉसोफिला व झेब्राफिश या सजीवांची प्रारूपे तयार केली आहेत.
 
==एपिजेनेटिक्स==
एपिजेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्राच्या पुढच्या टप्प्याचे (एपि) शास्त्र. मानवात, तसेच बहुतेक सजीवांत पेशींच्या केंदकांत डीएनए असतात. या डीएनएवरील माहिती ए, टी, जी आणि सी या रासायनिक स्वरूपांत असते. या रासायनिक स्वरूपांत बदल होतो. म्हणजे डीएनएची शृंखला तशीच असते, परंतु रासायनिक स्वरूप बदलत जाते. या बदलांचा अभ्यास एपिजेनेटिक्समध्ये केला जातो.
 
मानवांमधील डीएनए सारखेच असतात. असे असताना प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते. तिचे रंग, रूप, आचार, विचार हे सारे वेगळे का असते याचे उत्तर एपिजेनेटिक्समध्ये मिळते. डीएनएच्या रासायनिक स्वरूपातील बदलांमुळे आनुवांशिकत्व बदलते. ही बदलाची प्रक्रिया सतत चालू असते. डीएनए यांच्या जोडीला प्रथिनेही असतात. त्यांमध्येही बदल होत असतात. या बदलांची दखल पेशींमध्ये घेतली जाते. या बदलांना क्रोमेटिन चेंजेस म्हटले जाते. या क्रोमेटिन चेंजेसचा अभ्यास करता आला, तर विविध व्याधींबद्दल माहिती मिळू शकते.
 
==डॉ. संजीव गलांडे यांना मिळालेले पुरस्कार==