"सारडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
 
सारडे येथील अनेकजण लोक नोकरीच्या निमित्ताने बव्हंशी मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण येथे राहतात क्वचित काही कुटुंबे अमेरिकेत स्थलांतरित झाली आहेत, तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत टांझानिया येथे जाऊन आली आहेत. परंतु त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्‍या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात.
 
असे असल तरी गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉस्पिटल नाही आहे.आरोग्यविषयक बाबींसाठी संपूर्ण गावाला इतरत्र जावे लागत आहे, हे भयानक वास्तव आहे. येथे शेतकर्‍यांसाठीचा खाडी पार करणारा पूल कोसळला आहे, त्यामुळे पलीकडे जायचे असेल तर खाडीतून जावे लागते किंवा वाहतुकीच्या पुलावरुन पलीकडे जावे लागते. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही न्हाहा-शेवा बंदरात.
 
अवजड जड माल वहातुकदारांच्या बेजबाबदारपणे वाहने चालविल्यामुळे गावात अनेक अपघात होतात.
पाणी व्यवस्था :- बहुंताशी पाणीपुरवठा पुनाडे धरणातून होतो, परंतु जेव्हा तो खंडित होतो तेंव्हा गावातील सार्वजनिक विहिरी आणि घोलातील असलेल्या डोर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. तेथे पाण्याचा उपसा झाला तर बाभळीवर, तेथे नसेल तर थेट चोंडी गावाला जावे लागते.
विजेची सोय :- गावात नेहमीच भार नियमन चालू असते. अनेकदा, विशेषत:पावसाळ्यामध्ये गावातील लोकांना अंधारात रहावे लागते. दरवर्षी येथे बिघाड होतोच.
.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सारडे" पासून हुडकले