"लीलाधर हेगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लीलाधर हेगडे हे साने गुरुजींच्या ’धडपडणार्‍या मुल...
(काही फरक नाही)

१३:४८, २६ जून २०१५ ची आवृत्ती

लीलाधर हेगडे हे साने गुरुजींच्या ’धडपडणार्‍या मुलां’पैकी एक होते. ते एक मराठी शाहीर आहेत. समाजवादी पक्षात असलेले हेगडे, हे राष्ट् सेवा दलाच्या कलापथकात सुधा वर्दे, वसंत बापट, आदींबरोबर लोकजागृतीसाठी गावोगाव प्रवास करत.

हेगडे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सहभागी झाले. मुंबईतल्या चुनाभट्टीतील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७०च्या आधीपासून सांभाळत आहेत.

आपल्या गीतांतून राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागविण्याबरोबरच उमलत्या पिढीत सुसंस्कारांची रूजवात व्हावी यासाठी अखंड धडपडणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये शाहीर हेगडे अग्रस्थानी आहेत. ’उत्तुंग आमुची उत्तर सीमा’, ’माझे राष्ट्र महान’ ही लीलाधर हेगडे यांनी गायलेली अजरामर गीते होत. मुलांसाठी हेगडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्‍यांच्या लेखनात एक लय आहे. त्यामुळे या लेखनाचा उपयोग मुलांवर संस्कार होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने होत असतो.

लीलाधर हेगडे यांची मुलांना आवडलेली काही पुस्तके

  • अंधारातून प्रकाशाकडे
  • पाचूचे बेट
  • मनी हरवली, मनी सापडली
  • हणमू आणि इतर गोष्टी



लीलाधर हेगडे यांनी मिळालेले पुरस्कार

  • साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान