"जॉन नॅश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जॉन नॅश (जन्म : ब्लूफील्ड (पश्चिम व्हर्जीनिया, अमेरिका), १३ जून, १९२...
(काही फरक नाही)

१३:१६, २० जून २०१५ ची आवृत्ती

जॉन नॅश (जन्म : ब्लूफील्ड (पश्चिम व्हर्जीनिया, अमेरिका), १३ जून, १९२८; मृत्यू : मोनरो नागर वस्ती (न्यूजर्सी, अमेरिका), २३ मे, २०१५) हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिती होते.

बालपण

जॉन नॅश यांचे वडील अभियंता आणि आई शिक्षिका होती. जॉन शालेय वयातही वेड्यासारखे वाचायचे आणि दुसरे म्हणजे ते जेव्हा वाचत नसायचे तेव्हा शीळ वाजवत असायचे. याच वयात, ई.टी. बेल यांचे 'झेन ऑफ मॅथेमेटिक्स' हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि जॉन नॅश हे आमूलाग्र बदलले. तोपर्यंत वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. तिची जागा गणिताच्या प्रेमाने घेतली.

गणिती जीवन

पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अत्यंत गुंतागुंतीची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले. अपघातात्मरण पावण्याआधी याआधी प्रा. नॅश यांनी गणिताची सुंदर दुनिया आपल्या अनोख्या प्रतिभेतून जगासमोर उलगडून ठेवली होती.

शक्याशक्यतावरचे संशोधन

सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईर्षा असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली.

उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसर्‍यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसर्‍याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एक ना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली.

गेम थिअरी

जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणार्‍या बँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच 'गेम थिअरी' म्हणतात

प्रा. नॅश यांच्या आधी जॉन वॉन न्यूमन यांनी या संदर्भात गेम थिअरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली.