"नाना मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[वसंतराव देशपांडे]], श्रीमती [[शोभा गुर्टू]], पं. [[कुमार गंधर्व]], पं. [[सी.आर. व्यास]] इतकेच काय, जुन्या पिढीतील [[उस्ताद अमीर खान]]साहेबांपासून ते पुढच्या पिढीतील अनेक तरुण गायकांना नाना मुळे यांना तबल्याची साथ केली. या सर्वांच्या बरोबर असंख्य कार्यक्रम वाजवले. इतके कार्यक्रम वाजवले, की नानांना अनेक महिने कुटुंबीयांचे दर्शनही होत नसे. नामवंत गवयांच्या साथीच्या निमित्ताने त्यांचे संपूर्ण भारतभर भ्रमण तर झालेच, शिवाय अनेक परदेश दौरेही झाले.
 
उस्ताद [[उस्ताद अमीर खान]]साहेबांना लागणारा अतिविलंबित लयीतील झुमरा ठेका असो, नाहीतर श्रीमती शोभा गुर्टूसारख्या उपशास्त्रीय गायनातील सम्राज्ञीबरोबर ठुमरीतील[[ठुमरी]]तील रंगतदार, नजाकतदार वादन असो. ख्याल असो, [[उपशास्त्रीय संगीत|उपशास्त्रीय गायनातील]] [[ठुमरी]] असो, की नाट्यगीते असोत, नाना सगळ्यात पारंगत. उमेदवारीच्या काळात जिथे जिथे शक्‍य आहे, अशा सर्व ठिकाणी सर्व गायनप्रकारांबरोबर, अगदी [[कीर्तन|कीर्तनांपासून]] ते अनेक गायनप्रकारांबरोबर नानांनी साथ केली.
 
अतिशय दमदार ठेका, ठेक्‍यातील अक्षरांचे माधुर्य, त्याचबरोबर उस्ताद घम्मणखॉंसाहेबांकडून घेतलेली लग्गी-नाडा किंवा तबल्यातील [[उपशास्त्रीय गायनप्रकारातसंगीत|उपशास्त्रीय गायनप्रकारातील]] साथसंगतीची विशिष्ट तालीम, यामुळे नाना मुळे हे सर्व गवयांचे आवडते साथीदार होते. नानांनी सतत ५० वर्षे गायकांची तबल्यावर साथ केली, आणि नंतर निवृत्ती घेतली.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाना_मुळे" पासून हुडकले