"फहमीदा रियाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''फहमीदा रियाज''' (जन्म : मीरत-उत्तर प्रदेश-भारत, २३ जुलै, १९४६) या एक प...
(काही फरक नाही)

२१:२९, ५ जून २०१५ ची आवृत्ती

फहमीदा रियाज (जन्म : मीरत-उत्तर प्रदेश-भारत, २३ जुलै, १९४६) या एक पाकिस्तानी कवयित्री आहेत.

फहमीदा रियाज यांचे वडील रियाज‍उद्दीन अहमद हे मीरतमध्ये शिक्षणाधिकारी होते. पुढे सिंध प्रांतात बदली झाल्याने ते पाकिस्तानात स्थायिक झाले. फहमीदा चार वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. तिच्या आई हुस्ना बेगम यानीे फहमीदाचे शिक्षण चालू ठेवले. तेथेच फहमीदा सिंधी, उर्दू आणि फारसी शिकली.

महाविद्यालयात असताना फहमीदा ’युनिव्हर्सिटी ऑर्डिनन्स व स्टुडन्ट युनियन ट्रस्ट’च्या बंदीविरुद्ध लिखाण करू लागल्या, भाषणे देऊ लागल्या. हळूहळू त्यांची ओळख कार्यकर्ती व बंडखोर प्रगतीशील स्त्रीवादी लेखिका म्हणून होऊ लागली.

कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर फहमीदा पाकिस्तान रेडियोवर निवेदक म्हणून काम करू लागल्या.

कविता लेखन

फहमीदाची पहिली कविती त्या १५ वर्षांची असताना ’फुनून’ या नामवंत मासिकात प्रसिद्ध झाली. मूळ भारतीय पिंड असल्याने फहमीदा यांच्या कवितांत हिंदी-संस्कृत शब्दांचा भरणा असतो. त्यांच्या कवितांत व गीतांत राम, कृष्ण, पांडव, शाप, तांडव, भगवान, मेघदूत, भरतनाट्यम, सिंहासन, गृहिणी असले शब्द सापडतात.


(अपूर्ण)