"ना.गो. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब [[चाफेकर (]]/चापेकर) (जन्म : [[मुंबई]], ५ ऑगस्ट १८६९; मृत्यू : [[बदलापूर]], ५ मार्च १९६८). हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्‌मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय.होता..
 
चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रेवदंडा]] येथे झाले. [[मुंबई]]तून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[बदलापूर]] येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.
 
==निवृत्तीनंतर==
सेवानिवृत्तीनंतरच्या काळात 'भारत इतिहास संशोधक मंडळ', 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा', 'राजवाडे संशोधन मंडळ', 'धर्मनिर्णय मंडळ' आदी अनेक संस्थांमधून [[चाफेकर|चाफेकरांनी]] काम केले. अनेक नव्या-जुन्या साहित्यिकांना एकत्र आणून त्यांनी 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'ला ऊर्जितावस्थेला आणले. पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. त्या विद्यापीठाकडून १९६६ साली ना.गो. चापेकर यांना डी.लिट्‌. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.
 
==ना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके==
Line २३ ⟶ २६:
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]