"नारायणराव घोरपडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बाबासाहेब घोरपडे''' ऊर्फ '''नारायणराव घोरपडे''' ([[इ.स. १८७०]]:[[करकंब]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १९४३]])हे [[इचलकरंजी]]चे [[इचलकरंजी संस्थान|संस्थानिक]] होते. यांचे पाळण्यातले नाव ''गोपाळ जोशी करकंबकर'' होत. [[इचलकरंजी]]चे संस्थानिक आबासाहेब घोरपडे हे निपुत्रिक होते. संस्थानाच्या गादीला वारसा म्हणून त्यांनी पंधरा मुलांमधून देखण्या व चुणचुणीत गोपाळ जोशीची निवड केली आणि त्याला दत्तक घेतले आणि गोपाळ जोशी हे नारायणराव (बाबासाहेब) घोरपडे झाले.
 
घोरपडे घराण्याच्या परंपरेनुसार बाबासाहेब घोरपडे रीतसर शिक्षण घेतले. आधी [[कोल्हापूर]]च्या राजाराम कॉलेजात व नंतर [[मुंबई]]च्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. लहान वयांतच त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथांच्या वाचनाची आवड होती. कॉलेजात्गेल्यानंतरकॉलेजात गेल्यानंतर त्यांचे वाचन अधिक प्रगल्भ झाले.
 
विद्यार्थिदशेत असताना बाबासाहेब घोरपड्यांना [[न्यायमूर्ती रानडे]] यांच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले होते. [[लोकमान्य टिळक]]ंचाही त्यांच्यावर प्रभाव होता. [[इचलकरंजी]]च्या संस्थानिकपदाची सूत्रे हाती पडल्यावर झाल्यावर त्यांनी आपल्या प्रजजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक उन्‍नतीकडे लक्ष दिले. बाबासाहेबांना सर्व प्रकारच्या कलावंतांना
 
बाबासाहेबांनी [[इचलकरंजी]] संस्थानात सर्व प्रकारच्या कलावंतांना उदार आश्रय दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शाहूनगरवासी मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, किर्लोस्कर, गंधर्व या नाटक मंडळ्या अतिशय जोमात होता. या नाटक मंडळींना [[इचलकरंजी]] संस्थानात आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावण्यात येत असे, व त्यांची नाटके जनतेसाठी म्हणून लावली जात.
 
[[बालगंधर्व]]ांचे एकच प्याला हे घोरपड्यांचे आवडते नाटक होते. शोकपर्यवसायी असले तरी बालगंधर्वांचा स्वर ऐकण्यासाठी बाबासाहेब ते नाटक पुन्हा पुन्हा पाहीत. बाबासाहेबांनी जर प्रत्यक्ष नाटकात अभिनय केला नसला तरी ते एक मर्मज्ञ प्रेक्षक होते.
 
बाबासाहेब घोरपडे उत्तम वक्ते नव्हते, तरी ते अनेक संस्थांच्या कार्यक्रमांत अध्यक्ष असत. त्यांनी फारसे लेखन केले नसले तरी, उतारवयात बाबासाहेबांनी काही इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे केली; किर्लोस्कर, सह्याद्री इत्यादी नामवंत मासिकांमधून त्यांनी थोडेफार स्फुट लेखन केले. त्याच बरोबर ब्रिटिश संस्कृतीने प्रभावित होऊन तिचे गुणगान करणारे एक स्वतंत्र पुस्तकही लिहिले.
 
==सन्मान==
बाबासाहेब घोरपड्यांसारख्या अशा एका कलाप्रेमी व नाट्यप्रेमी संस्थानिकाला सांगली येथे १९२४ साली झालेल्या २०व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचा]] अध्यक्ष होण्याचे सद्‌भाग्य लाभले.
 
 
विद्यार्थिदशेत असताना बाबासाहेब घोरपड्यांना [[न्यायमूर्ती रानडे]] यांच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले होते. [[लोकमान्य टिळक]]ंचाही त्यांच्यावर प्रभाव होता. [[इचलकरंजी]]च्या संस्थानिकपदाची सूत्रे हाती पडल्यावर झाल्यावर त्यांनी आपल्या प्रजजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक उन्‍नतीकडे लक्ष दिले. बाबासाहेबांना सर्व प्रकारच्या कलावंतांना
 
{{DEFAULTSORT:घोरपडे, बाबासाहेब}}
Line ९ ⟶ २०:
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इचलकरंजीचे राजे|बाबासाहेब]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]