"पटवर्धनी पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग''' हे दृक्‌प्रत्यय देणारे पंचांग...
(काही फरक नाही)

२२:५५, १५ मे २०१५ ची आवृत्ती

केरोपंती अथवा पटवर्धनी पंचांग हे दृक्‌प्रत्यय देणारे पंचांग शके १७८७ पासून छा्पून प्रसिद्ध होऊ लागले. ह्यात अक्षांश आणि रेखांश मुंबईचे घेतले होते. सुप्रसिद्ध गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे हे याचे कर्ते असून आबासाहेब पटवर्धन हे प्रवर्तक होते.

या केरोपंती पंचांगाचे गणित प्रथम काही वर्षे स्वतः केरोपंतांनी केले असावे; परंतु पुढे त्यांच्या देखरेखीखाली हे गणित वसई येथील आबा जोशी-मोघे हे करीत असत. शेवटी शेवटी केरोपंतांचे वंशज नीलकंठ विनायक छत्रे यांच्या देखरेखीखाली हे पंचांग बनत असे.