"वासंती (चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
१९१७ मध्ये [[बाबूराव पेंटर|बाबूराव पेंटरांनी]] [[कोल्हापूर]]ला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह [[कोल्हापूर]]च्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद [[अल्लादिया खान]] साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच [[बाबूराव पेंटर|बाबूराव पेंटरांनी]] त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
 
१ जून १९२९ रोजी [[विष्णुपंत दामले]], [[व्ही. शांताराम]], केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), [[शेख फत्तेलाल]] व सीतारामपंत कुलकर्णी यांनी [[प्रभात फिल्म कंपनी]]ची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने [[कोल्हापूर]] सोडून [[पुणे|पुण्याला]] स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्ट’‘बजरबट्टू’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.
 
प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. [[संत एकनाथ|संत एकनाथांनी]] आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांनी]] वासंतीची पाठ थोपटली होती.
ओळ १७:
'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.
 
==संगीताचे शिक्षण आणि ध्वनिमुद्रण==
जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. [[वामनराव सडोलीकर]] हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.
 
अभिनयाबरोबरच सुगम गायनाचे क्षेत्रही वासंतीने काबीज केले. घराजवळच ग्यानदत्त राहात होते; त्यांनी काही गीतांना संगीत देऊन वासंतीच्या वाजात रेकॉर्डिग केले. मदन मोहन त्यावेळी तरुण होते, त्यांचे घरी येणे-जाणे होते. घम्मन खाँसाहेबांची तालीम चालू असताना ते लक्षपूर्वक ऐकत, कधी पेटी घेऊन आपल्या चाली ऐकवत. [[दत्ता डावजेकर]], [[मास्टर कृष्णराव]], [[खेमचंद प्रकाश]], [[सुधीर फडके]] यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली वासंतीची सुमारे २०० गाणी रेकॉर्ड झाली. काही चित्रपटांच्या गाण्यात [[दुर्गा खोटे]], [[शांता आपटे]], [[विष्णुपंत पागनीस]], [[खुर्शीद]], कांतिलाल, [[सी. रामचंद्र]] हे सहगायक कलाकार होते. [[कुंदनलाल सैगल]], [[बेगम अख्तर]] यांनी वासंतीला गाण्याचे मनापासून कौतुक केले.
 
==नाट्यसृष्टीत प्रवेश==
चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. [[वामनराव सडोलीकर]] (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सधोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. ''पोरी, तू रडवलंस आम्हाला'' असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.
 
प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. ''पोरी, तू रडवलंस आम्हाला'' असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.
==अखेरचा चित्रपाट आणि विवाह==
इ.स. १९४४मध्ये प्रकाशित झालेला 'भाग्यलक्ष्मी' हा वासंतीचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर इंदुभाई पटेल यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गृहिणी-माता या भूमिकेत वासंती रमून गेल्या.
 
==वासंतीची भूमिका असलेले चित्रपट==
* अछूत
* अमर ज्योती
* अयोध्येचा राजा (मूकपट)
* आपकी मर्जी
* कुंकू
* कुर्बानी
* कृष्णजन्म (मूकपट)
* संत तुलसीदास
* दीवाली
* दु:ख-सुख
* दुनिया न माने (हिंदी)
* धर्मात्मा
* पहिली मंगळागौर
* बजरबट्टू (मूकपट)
* भक्तराज
* भाग्यलक्ष्मी
* मायामच्छिंद्र (मूकपट)
* मीना (अप्रकाशित)
* मुरलीवाला (मूकपट)
* मुसाफिर
 
==पुरस्कार==
* 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' हा किताब
* 'गौहर सुवर्ण पदक'
* 'पं. वामनराव सडोलीकर फाउंडेशन'तर्फे जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक पं. वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. त्या वेळी संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि गायन/वादन क्षेत्राप्रमाणेच पंडितजींचे आणखी एक यशस्वी कार्यक्षेत्र असलेल्या नाट्यक्षेत्रामध्ये अग्रणी असणाऱ्या कलावंतांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा सन्मान करण्यात येतो. इ.स.२०१५ सालचा 'पं. वामनराव सडोलीकर जीवन गौरव सन्मान' वासंती पटेल यांना प्रदान करण्यात आला.