"शांता मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शांता मोडक (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या...
(काही फरक नाही)

१६:५७, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती

शांता मोडक (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या.

त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंदूरमधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित 'चूल आणि मूल' या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रभाकर नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये 'भावबंध' या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यांची 'झुंझारराव' नाटकातील कमला ही भूमिका गाजली. त्यांनी 'इन मीन साडेतीन', 'ऊन-पाऊस' अशा चित्रपटांतून भूमिका साकारल्या.


पुरस्कार

  • महाराश्ट्र राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार