"रघुनाथ कृष्ण फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९७२ मधील मृत्यू using HotCat |
No edit summary |
||
ओळ १:
'''रघुनाथ कृष्ण फडके''' ([[इ.स. १८८४]] - [[१७ मे]], [[इ.स. १९७२]]) हे [[मराठा|मराठी]] शिल्पकार होते. यांना इ.स. १९६१ साली [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
रघुनाथ कृष्ण फडके यांनी मूर्तिकला, चित्रकला यांपैकी कशाचेही शिक्षण शाळा किंवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे या दोन कलांविषयी असलेले ज्ञान, माहिती व कौशल्ये हे सारे स्वकष्टातून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे प्रगल्भ झालेले होते. रघुनाथ फडके मात्र मूर्ती घडवण्याच्या कामात निपुण होते. मुंबईच्या चौपाटीवर असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा त्यांनीच घडवला. या पुतळ्याच्या बनावटीवरून फडकॆ यांचे ओतकामातील कौशल्य व इतर काही तांत्रिक बाबी लक्षात येतात.महादेव धुरंधरांसारखे श्रेष्ठ चित्रकारदेखील त्यांना मानत होते.
== कारकीर्द ==
==विशेष==
आर्थिक ओढाताण होत असल्याने फडक्यांचे संपूर्ण आयुष्यच हलाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र तरीही त्यांनी पोट भरण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला नाही. शिल्पकलेसोबतच त्यांना संगीताचीदेखील आवड होती. ते स्वत: गायन-वादन शिकवीत असत. अभिजात भारतीय नाट्यसंगीताचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांनादेखील फडके यांनी तबल्याची साथ केली होती. . तत्कालीन ज्येष्ठ कलाकार गोविंदराव टेंबे आणि हिराबाई बडोदेकर यासारख्या कलाकारांनी आपला पुतळा फडके यांनीच तयार करावा असा आग्रह धरला होता, यातच फडकेंची शिल्पकलेतील महानता लक्षात येते. रघुनाथ फडके हे महादेव धुरंधरांच्या कन्या, अंबिका धुरंधर यांना दहा बारा पाने लांबीची पत्रे पाठवत असत. त्यांतून अंबिकाबाईंना विविध कला आणि साहित्यप्रकारांबद्दल नवनव्या गोष्टी कळायच्या, असे अंबिकाबाईंनी त्यांच्या 'माझी स्मरणचित्रे' या पुस्तकात लिहिले आहे.
{{DEFAULTSORT:फडके,रघुनाथ कृष्ण}}
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
|