"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७७:

* [[गोविंद वासुदेव कानिटकर]] यांनी शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’व्यतिरिक्त ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचेही मराठी अनुवाद केले आहेत.

==शेक्सपियरच्या वाङ्मयाचे अभ्यासक प्रभाकर देशपांडे ==
शेक्सपिअरची ३७ नाटके, पण त्यात ओळी किती? ७३ वर्षांच्या प्रभाकरराव देशपांडे यांच्याकडे यासह अशा सर्व बाबींची नोंद आहे. जगविख्यात नाटककार तिकडे लिहीत होता, तेव्हा मराठी मुलखात काय चालले होते? देशपांडे सांगतात, एकनाथमहाराज ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करीत होते.. शेक्सपियरच्या अशा अनेक गोष्टींसह त्यांच्या नाटकाचा कथानुवाद सोप्या पद्धतीने केलेल्या या ' शेक्सपियरवेड्या माणसाचे साडेबाराशे पानांचे पाच खंड जागतिक ग्रंथदिनी (२३ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले. शेक्सपियरने झपाटलेल्या परभणीच्या देशपांडे यांना नाटकातील म्हणींपासून ते पात्रांचे गाजलेले संवादही तोंडपाठ आहेत.

देशपांडे यांची अख्खी कारकीर्द पशुसंवर्धन विभागात गेली. मात्र, इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. मर्चंट ऑफ व्हेनिस, मॅकबेथ. त्यानंतर त्यांनी अन्य चार नाटके अभ्यासली. पुढे एक कथा लिहिली व नंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी शेक्सपियरचा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. देशपांडे एक एक नाटक ते वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा, बाजूला टिपणे काढायची आणि त्यावर लिहायचे. लेखन सुरू केल्यावर पहिला खंड ७ शोकांतिकांचा झाला. शेक्सपियरचे ५ खंडही तसेच लिहून झाले.

===प्रभाकर देशपांडे यांची पुस्तके===
;खंड १ : सात शोकांतिका -

*रोमिओ ॲन्ड ज्यूलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅक्बेथ, ज्यूलियस सीझर, अँटनी ॲन्ड क्लिओपात्रा.
;खंड २ : सात सुखान्तिका -

*अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्थ नाईट, मच अ‍ॅडो अबाऊट निथग, अ मिड समर नाईट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एर्स, टेिमग ऑफ श्ऱ्यू, द र्मचट ऑफ व्हेनिस.
;खंड ३ : सात नाटके -

*ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅड क्रेसिडा, द मेरी वाईव्हज ऑफ विंडसर, लव्ह्ज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमन ऑफ व्हेरोना, टायटस अँड्रानिकस
;खंड ४ : आठ नाटके -

*टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलीन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द िवटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, हेन्री द एड्थ.
;खंड ५ : आठ ऐतिहासिक नाटके-

*हेनरी द सिक्स्थ १, हेन्री द सिक्स्थ २, हेन्री द सिक्स्थ ३, रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, हेन्री द फोर्थ १, हेन्री द फोर्थ २, हेन्री द फिफ्थ.

==हेही पहा==