"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.
 
==सामाजिक कार्यातआणि बालपणीचराजकीय सहभागकारकीर्द==
शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.
 
पुढे तरुणपणी १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.
 
शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती..
 
==मुंबई-पुणे-मुंबई==
Line १६ ⟶ २०:
 
==लोकसंगीत==
लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. या .अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणार्‍या 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.
 
राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी 'जागृती शाहीर मंडळ' स्थापन केले. पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. शाहिरीचे प्रशिक्षण देणाऱ्या 'शाहीर साबळे प्रतिष्ठान'च्या माध्यमातून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. शाहीर साबळ्यांच्यानंतर त्यांच्या समृद्ध कलेचा वारसा त्यांचा मुलगा देवदत्त साबळे, मुलगी चारुशीला साबळे आणि नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे आला.
 
==शाहीर साबळे यांचे रंगमंचावरील प्रयोग==
शाहीर साबळे यांनी कलाक्षेत्रात नेहमी नवनव्या वाटा चोखाळल्या. भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावतील असे अचाट प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले. मोबाइल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवाद्वितीय प्रयोगही त्यांनी सादर केला. लोकनाट्यात बदल करून त्यांनी 'मुक्तनाट्य' निर्माण केले.
 
==शाहीर साबळे यांच्या लेखनकृती==
* आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
* आंधळं दळतंय (मुक्तनाट्य)
* ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
* यमराज्यात एक रात्र (इ.स. १९६०, पहिले मुक्तनाट्य)
* बापाचा बाप (मुक्तनाट्य)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)
 
 
==शाहीर साबळे यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते==
* आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
* आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
* आधुनिक मानवाची कहाणी (कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा)
* दादला नको ग बाई (भारूड)
* पयलं नमन (नांदीगीत)
* बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
* मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
* मुंबावतीची लावणी
* या विठूचा (भक्तिगीत)
* विंचू चावला (भारूड)
* हरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
 
==त्यांच्या लेखनकृती==
* आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
* आंधळं दळतंय (मुक्तनाट्य)
* ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
* बापाचा बाप (मुक्तनाट्य)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)
 
==शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
Line ४० ⟶ ५३:
* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
* भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
* भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणार्‍या पथकात सहभाग
* पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* संत नामदेव पुरस्कार
* पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
* १९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==