"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==सामाजिक कार्यात सहभाग==
अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश- प्रसंगी उपस्थित होते.
 
==मुंबई-पुणे-मुंबई==
शिक्षणाची आबाळ होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून "हिरा हरपला‘ हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले. पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो, हे जेव्हा चुलत्यांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले. मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवा सूर गवसला. थोड्या फार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधी मिळाली; पण तेथेही मन जास्त रमले नाही. म्हणून शाहीर साबळे यांनी पुन्हा ना एकदा मुंबई गाठली.
 
अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते.
 
== लेखन ==