"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''कृष्णा कल्ले''' (जन्म : इ.स. १९४१; मृत्यू : मुंबई, १५ मार्च, २०१५) या एक [[मराठी]] [[सुगम संगीत]] [[गायिका]] होत्या.. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक [[हिंदी]], [[पंजाबी]], गुजराथी]] व शंभरहून जास्त [[मराठी]] गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील [[लावणी|लावण्या]] त्यांनीच गायलेल्या आहेत. त्या इ.स. १९६०पासून [[मुंबई]] [[आकाशवाणी]]च्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.
 
मूळच्या [[कारवार]]ी, पण वडिलांच्या [[उत्तरप्रदेश]]ातील [[कानपूर]] येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा [[जन्म]] आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी [[हिंदी]]-[[ऊर्दू]] भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन [[पंतप्रधान]] [[पंडित नेहरू]] आणि [[राष्ट्रपती]] [[राजेंद्रप्रसाद]] यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर [[रेडिओ]] स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा‍र्‍या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.
ओळ ५:
एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज [[गायक]] [[अरुण दाते] यांच्या कानावर पडला आणि त्यांन‌ी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणा‍र्‍या [[संगीत दिग्दर्शक]] [[यशवंत देव]]ांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर [[अनिल मोहिले] यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी [[भावगीते]] गाऊन घेतली.
 
आलम आरा ([[हिंदी]]), गुणसुंदरीनो घर संसार ([[गुजराथी]]), अज दी हीर ([[पंजाबी]]) या अमराठी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली. जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतहीचित्रपटांसाठीही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. हिंदीतील सुमारे २०० आणि मराठीतील सुमारे १०० चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला. १००हून अधिक भजने, भक्तिगीते व गझला त्या गायल्या आहेत.
 
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)==
ओळ ३९:
* रामप्रहरी रामगाथा ([[श्रीनिवास खळे]])
 
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी-पंजाबी-गुजराथी गाणी==
* आज जश्ने-खुशनसीबी है (हिंदी चित्रपट आलम आरा, सहगायिका चंद्राणी मुखर्जी आणि इतर)
* गाल गुलाबी नैन शराबी (सहगायक [[मोहम्मद रफी]])
* आजा ले ले (पंजाबी चित्रपट -अज दी हीर)
 
* तेरा वादे पे वादा होता गया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, सहगायिका [[प्रीती सागर]])
* पाटणना चौकमां गरबो (गुजराथी चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार, कोरस)
* मेरी ह्सरतोंकी दुनिया (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी, (सहगायक [[मोहम्मद रफी]])
* मेहंदी रचेगी (हिंदी चित्रपट -गाल गुलाबी नैन शराबी)
* हाल ए दिल क्या करें (हिंदी चित्रपट -आतिश)
* हीर जत्ती दा विलायती रांझा (पंजाबी चित्रपट -अज दी धार)
* हीरनी दोरी हलरा दू (गुजराथी चित्रपट -गुणसुंदरीनो घर संसार)
==पुस्तक==
कृष्णा कल्ले यांच्या जीवनावर 'गायिका कृष्णा कल्ले : एक कृतार्थ गानप्रवास' नावाचे पुस्तक [[वसुधा कुलकर्णी]] यांनी लिहिले आहे.