"दत्तो वामन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
==अध्ययन आणि अध्यापन==
द.वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे.
 
दत्तो वामन पोतदार अविवाहित होते.
Line ३९ ⟶ ४१:
==दत्तो वामन पोतदारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द==
* १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले.
* १९१८ ते १९४७ ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३ पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते.
* १९२२ मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. १९४० मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
* १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते.
* १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते.
Line ४८ ⟶ ५२:
* १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले.
* १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.
 
==दत्तो वामन पोतदारांनी स्थापन केलेल्या संस्था==
* मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस (१९३५). हिची पुण्यास स्थापना करून तिचे पहिले अधिवेशन पुण्यासच भरविले. पण पुढील अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. या संस्थेच्या दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९४८).
* महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा. या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
 
==पोतदारांना मिळालेले सन्मान==
Line ५३ ⟶ ६१:
* हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली.
* बनारसच्या हिंदू विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 
 
==द.वा. पोतदार यांनी लिहिलेली पुस्तके==
* ऐतिहासिक चरित्रलेखन (१९३८)
* दगडांची कहाणी
* पुरोगामी वाङ्‌मय - दोन टिपणे (१९३७, १९३८)
* पोतदार विविध दर्शन (१९३९)
* प्रांतिक भाषांचे भवितव्य (१९३५)
* भारताची भाषासमस्या (१९६८)
* भाषावार विद्यापीठे (१९३७)
* मराठी इतिहास व इतिहास-संशोधन (विहंगम निरीक्षण) (१९३५)
* मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२)
* महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३)
* महाराष्ट्रातील सौंदर्यस्थळे (१९३७)
* मी युरोपात काय पाहिले?' (प्रवासवर्णन; १९६०)
* देवदासकृत संतमालिका (संपादित, १९१३)
* सुमन-सप्तक (व्यक्तिचित्रणे, १९५०)
* श्रोते हो (व्याख्यानसंग्रह)
* श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (संपादित, १९३४)
 
== पुरस्कार ==
Line ६३ ⟶ ८४:
 
== संकीर्ण ==
दत्तो वामन पोतदार हे [[इ.स. १९३९|१९३९]] साली [[अहमदनगर|अहमदनगरात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.