"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९०:
* '''नागपुरी''' - <br />
पूर्व विदर्भातील [[नागपूर]], [[वर्धा]], [[चंद्रपूर]] चा काही भाग आणि गडचिरोली चा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील [[शिवनी]], [[छिंदवाडा]], [[बालाघाट]] व [[रायपूर]] या भागातही ही बोली प्रचलित आहे. वर्‍हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्‍हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर [[हिंदी]] शब्दांचाही प्रभाव आढळतो.
* [[नारायणपेठी बोली]] - <br />
महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.
* '''बेळगावी''' - <br />
[[बेळगाव]] या महाराष्ट्राच्या सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, [[कोकणी]] अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख [[पु.ल. देशपांडे]] यांच्या रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. [[प्रकाश संत]] लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. जसे ''काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला..''. या भाषेत गा हा प्रत्यय लावला जातो जसे 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)