"मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाव्दार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक [[जी.ए. कुलकर्णी]] ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. ’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्‍यांचे इंग्रजीत अनुवाद केले.
 
आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.. त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी [[मंगेश पाडगावकर]] यांच्या हस्ते झाले होते.
[[सांगली]] येथील ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
 
त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कांदबर्‍या आणि साहित्याबाबत त्यांनी आपली मते ठामपणे मांडलेली असायची त्यामुळे त्याविरोधात कोणीसुद्धा ब्र काढू नये इतके ते मत ठाम आणि परिपूर्ण असायचे. त्यामुळेच त्यांच्या स्मीक्षेला मराठी साहित्यात चांगलेच वलय प्राप्त झालेले असे.
 
म,द, हातकणंगलेकरांनी [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|साहित्य संस्कृती मंडळ]] तसेच [[विश्वकोश मंडळ|विश्वकोश मंडळावरही]] अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्‍न केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले.
 
==साहित्य संमेलन==
[[सांगली]] येथील ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. त्यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या भाषणात त्यांचे आवडते लेखक गूढ कथाकार [[जी.ए. कुलकर्णी]] यांचे त्यांच्या लौकिकाला साजेशे असे स्मारक जी.ए. च्या कर्मभूमीत [[धारवाड]] येथे उभा करण्यासाठी आपण जो प्रयत्‍न करत आहोत त्याला मराठी माणसांनी साथ द्यावी असे आवाहन केले होते.
 
मराठी साहित्य संमेलनाच्या सुमारास विद्रोही अगर समातंर साहित्य संमेलनाचा विषय फारच गाजतो, त्यामुळे होणारे साहित्य संमेलन हे साहित्यातील सर्व घटकांना घेऊन सर्वसमावेशक असावे असे हातकणंगलेकरांनी स्पष्ट केले होते. विद्रोही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र यावे असे आवाहनही केले होते. त्यांनी मराठी साहित्यातील अनेक चुकीच्या प्रथांवर तसेच चुकीच्या परंपरावरही प्रहार केले होते.
 
==प्रकाशित साहित्य==