"कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6374068
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कसबा गणपती म्हणजे कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. [[शिवाजी]]च्या आई [[जिजाबाई]] यांनी हे देऊळ बांधले.
 
हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. [[पुणे]] शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता [[जिजाबाई]] आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसर जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे..
 
गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत.
 
[[शिवाजी]] महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. आजही घरात होणार्‍या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात.
 
या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.
 
==कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ==
[[चित्र:Kasaba ganapati visarjan day 2008.JPG|thumb|right|250px|गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रमान असलेला ''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा'' गणपती पालखीतून नेला जात असताना (इ.स. २००८)]]
'''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ''' हे [[पुणे|पुण्यातील]] सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला [[पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक|पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत]] मानाचे स्थान आहे.
हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो.
 
==हे हीहेही पाहा==
*[[गणपती]]
*[[अष्टविनायक]]