"शिवार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: माजलगाव तालुक्यात भरणारे शिवार साहित्य संमेलन हे एक दिवसाचे स...
(काही फरक नाही)

१४:०३, १५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

माजलगाव तालुक्यात भरणारे शिवार साहित्य संमेलन हे एक दिवसाचे साहित्य संमेलन म्हणजे खर्‍या अर्थाने मातीतल्या साहित्य-संस्कृतीचा जागर असतो. कारण यात स्थानिक प्रतिभेला सामावून घेतानाच त्या-त्या गावातील कलावंतांनाही व्यासपीठ मिळवून दिले जाते. संमेलन फक्त एक दिवसाचे असले तरी आयोजकांची आत्मीयता आणि रसिकांचा मिळणारा प्रतिसाद बघून दरवर्षी थेट नांदेड, औरंगाबाद येथून अनेक प्रकाशक येतात ‌आणि पुस्तकांचे स्टॉल्स लावतात.

कुठलाही अभिनिवेष नसलेले हे संमेलन असल्यामुळे ते साधेपणाने साजरे होते. परंतु त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत आहे आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात न करताही स्थानिकांबरोबरच मान्यवर लेखकमंडळीही या संमेलनाबद्दल उत्सुकता दाखवतात. साधारणतः दरवर्षी २७ फेब्रुवारीच्या आसपासच्या रविवारी माजलगाव तालुक्यातीलच एखाद्या गावाला यजमानपद देऊन 'शिवार' साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते आणि मग गावकरी अगदी घरचे कार्य असल्यासारखे राबतात. सर्व व्यवस्था करतात. पाणी उपलब्ध आहे, अशा शेतात मंडप टाकला जातो. माजलगावहून मसापचे सर्व पदाधिकारी व कथा-कविता लिहिणारी सर्व साहित्यिक मंडळी सकाळी आठ-साडेआठपर्यंत संमेलनस्थळी येऊन पोहोचली की, संयोजक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरापासून ग्रंथदिंडी काढतात. या दिंडीत संमेलनाध्यक्ष, मसापचे पदाधिकारी, सरपंच, स्वागताध्यक्ष, उद्घाटक, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी सहभागी होतात. ही सगळी मंडळी साहित्याविषयी आस्था असलेली असतात. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आली की सर्वांची न्याहारी होते. न्याहारीला कांदा-पिठले-भाकरी अशी व्यवस्था असते. मग उद्घाटनसत्र संपन्न होते. हे सत्र संपले की कथाकथन सत्र असते. शेतकरी-कष्टकरी यांच्या जीवनाचे वास्तव कथन करणाऱ्या कथा प्रामुख्याने असतात.


पहा : साहित्य संमेलने