"आगरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.[http://prahaar.in/mahamumbai/thane/176542]
 
मुंबईतही एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 30३० टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे. (शक्य नाही. मुंबईत मराठी माणसांची संख्याही तितकी नाही.)
 
;आगरी समाजाच्या पोटजाती :
ओळ ९:
 
;बारा, चौदा, बावन्न पाटील (?) :
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन), शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी प्रकल्पामुळे(भाभा अॅटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.
 
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/आगरी" पासून हुडकले