"कल्याण (शहर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
==थोडक्यात ओळख==
इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदरातच केली होती. याच कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून शिवाजीच्या सैन्याच्या हातात सापडली असताना शिवाजीने तिला मानसन्मानासहित परत धाडले होते.
 
कल्याण व [[डोंबिवली]] या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी{{संदर्भ हवा}} असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६{{संदर्भ हवा}} असून (२००१च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३{{संदर्भ हवा}} किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी{{संदर्भ हवा}} आहे.