"कुंजवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|माधव गोडबोले}} कुंजवन हा भोरपासून १३किलोमीटरवरील कारी या...
(काही फरक नाही)

१४:२३, १० फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

कुंजवन हा भोरपासून १३किलोमीटरवरील कारी या गावी असलेला ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आश्रम आहे. त्याचे सर्व कार्य माधव गोडबोले नावाचे गृहस्थ पाहतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ जिथे घेतली, त्या रोहिडेश्‍वराच्या पायथ्याशी हा आश्रम आहे. आपल्या आजीला म्हातारपणी शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागल्याने गोडबोले यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे स्वप्न पाहिले आणि ते आता प्रत्यक्षात उतरवले. इ.स. २००४ सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्नी स्वतः करतात.

माधव गोडबोले संगीताच्या खासगी शिकवणी घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. (इ.स. २०१३ची माहिती). आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात.

या आश्रमात टीव्ही, फ्रीजपासून आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत.