"के.के. वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: के.के. ऊर्फ कर्मवीर काकासाहेब वाघ (जन्म : २६ ऑक्टोबर १८९८; मृत्यू : न...
(काही फरक नाही)

१८:४९, ६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

के.के. ऊर्फ कर्मवीर काकासाहेब वाघ (जन्म : २६ ऑक्टोबर १८९८; मृत्यू : नाशिक, २२ जुलै १९७३) हे एक राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांचे व्यक्तिमत्त्व

काकासाहेबांची देहयष्टी सहा फूट उंच होती. भरदार छाती व आवाजात जरब असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावशाली होते. आवाज पहाडी होता. बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनावर आणि शोषणकर्त्यांवर कर्मवीर काका आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोफ डागत असत. शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्ष शिस्तीची, स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीही पर्वा केली नाही. राजकीय पुढार्‍यांच्या रागलोभाची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील, तुम्हाला न भिता बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा, असे त्यांचे रोखठोक मत होते. पक्ष हे त्यांचे साध्य नसून साधन होते. त्यामुळे काकांनी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, कम्युनिष्ट पक्ष, पुन्हा काँग्रेस व भारतीय क्रांती दल असे प्रसंगानुरूप स्थलांतर केले. त्यापायी त्यांना अनेक वेळा अपयशही पत्करावे लागले, तरीसुद्धा काकांनी स्वतःच्या हिंमतीवर, कर्तबगारीने जनसेवा केलीच; सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी राजकीय पक्ष व सत्ता गौण मानून सहकार, शिक्षण शेती व बहुजनांच्या विकासासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले.