"कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:
 
* [[अजमल कसाब|अजमल अमीर कसाब]] - [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला|मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी]] जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी फाशी देण्यात आली आहे.
 
* [[अनिस इब्राहिम]] - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
* [[अफझल गुरू]] - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे भारताच्या तुरुंगात.होता. शेवटी त्याला फाशी देण्यात आले.
* अबू बकर अल बगदादी - इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड सीरिया (इसिस किंवा आयसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. इ.स. १९९९मध्ये जमात अल त्वाहिद अल जिहाद या नावाने स्थापन झालेली ही संघटना २००४मध्ये अल कायदाशी जोडली गेली. २००६मध्ये दहशतवाद्यांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेट जाहीर केले. २०१४च्या फेब्रुवारीत कायदाशी फारकत घेऊन अबू बकर अल बगदादीने ’आयसिस खिलाफत’ घोषित केली आणि लीबिया, इजिप्त, अल्जेरिया व सौदी अरेबियामधील काही प्रदेशांवर दावा केला..
* अबू बकर शेकाऊ - बोको हराम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. ’पाश्चात्‍य शिक्षण राक्षस आहे’ हा ’बोको हराम’ या शब्दसमूहाचा अर्थ. २००२मध्ये स्थापन झालेल्या या मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनेला अमेरिकेने २०१३मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. इ.स. २००९ ते २०१४ या काळात बोको हरामने ५००० लोकांच्या हत्या केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला या संघटनेचा विशेष विरोध आहे. सुमारे ५०० महिला आणि मुलांचे अपहरण या संघनेच्या लोकांनी केले आहे. त्यांमध्ये २७६ शालकरी मुलींचा समावेश आहे. बोको हरामचा भूतपूर्व म्होरक्या मोहम्मद युसुफ याचा २००९मध्ये खात्मा करण्यात आला, त्याच्या जागेवर सध्या (२०१५ साल) अबू बकर शेकाऊ आहे.
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्‍यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट