"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
महाराष्ट्र राज्याच्या पूर्व प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली म्हणजे झाडीबोली होय. महाराष्ट्र­ाच्या पूर्वेकडील [[भंडारा]], [[गोंदिया]], [[चंद्रपूर]] आणि [[गडचिरोली]] या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ''''झाडीबोली'''' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील [[बालाघाट]], [[दुर्ग]] व [[राजनांदगाव]] या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील [[नागपूर]] जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक '''झाडीबोली''' बोलतात.
 
==झाडीबोलीची वैशिष्ट्ये==
* झाडीबोलीत प्रमाण [[मराठी]]तील सर्व [[स्वर]] आहेत.
Line २७ ⟶ २८:
पण, '''पटा'''करिता एवढे मोठे साधन वापरणे येथील जाणकारांना अजिबात पसंत नाही. त्याकरिता त्यांनी केवळ एक अथवा जास्तीत जास्त दोन माणसे वाहून नेणारे नवीन साधन सिद्ध केले. त्यास झाडीबोलीत '''‘सेकडा'''' किवा '''‘[[छकडा]]'''' हे नाव आहे. स्थानिक '''वाढई''' म्हणजे सुतार याच्या कारागिरीचा विशेष नमुना म्हणून हा सेकडा पाहण्यासारखा असतो. बंडी, खासर व सेकडा यांचा आकार व उपयोग याचा विचार करता ट्रक, कार व फटफटी या आज उपलब्ध असलेल्या यांत्रिक वाहनांची झाडीपट्टीतील परंपरागत वाहनांशी तुलना करावयाची झाल्यास येथील बंडी म्हणजे मालवाहू ट्रक असून, खासर ही चारचाकी कारसारखी उपयोगात आणली जाते, तर सेकडा म्हणजे केवळ एकट्यादुकट्याने प्रवास करण्यास योग्य अशी फटफटी म्हणता येईल.
वाहनांच्या अधिक नावांसाठी पहा - [[प्राणिचलित वाहतूक साधने]]
 
==लोकसाहित्य==
झाडीबोलीत [[लोकसाहित्य|लोकसाहित्याचे]] अपार भांडार आहे. [[क्रीडागीते]], [[पाळणागीते]], [[सासुरवाशिणीची गीते]] असे अनेक प्रकार आहेत. धानाची रोवणी करताना बायकांच्या मुखातून रोवण्याची गाणी ऐकू येतात. [[महाशिवरात्री]]ला महादेवाच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या मुखांतून [[महादेवाची गाणी]] उमटतात. पोळयाला अकरावर गायल्या जाणाऱ्या झडत्या आणि घोडा नाचताना गायले जाणारे [[बिरवे]] त्या त्या प्रसंगीच ऐकायला मिळतात.
झाडीबोलीमध्ये [[भिंगीसोंग]] आणि [[दंडीगान]] सादर करणारे भिंगी व दंडी कितीतरी वर्षांपासून झाडीपट्टीतील जनतेचे रंजन करीत आहेत. दंडार, खडीगंमत, गंगासागर, डाहाका आणि गोंधड हे लोकरंजनासोबत लोकप्रबोधनाचा वसा घेतलेले काव्यप्रकार आहेत.
 
==नियतकालिके==
झाडीबोलीचे स्वत:चे [[मासिक]] आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).
 
==प्रकाशित साहित्य==
झाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणार्‍या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील [[कथा]] १६ मार्च १९८०च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित [[कविता]] समजली जाते.
Line ५४ ⟶ ५८:
* मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले -२००७)
* माजी मायबोली (बापुराव टोंगे -२००८)
* झाडीची माती (मिलिंद रंगारी -२००८)
* मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
* रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
Line ६१ ⟶ ६५:
 
==कथासंग्रह==
* वास्तुक (घनश्याम डोंगरे -.१९९८) झाडीबोलीतला पहिला [[कथासंग्रह]].
* पोरका (मा.तु. खिरटकर - २००१
* गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर - २००१)
* विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार - २००२)
* चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे - २००८)
* कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे - २००९)
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल - २००१)
 
==कादंबर्‍या/चरित्रे==
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे - २०१२)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
Line ८६ ⟶ ९०:
* १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने बावीस [[साहित्य संमेलन|साहित्य संमेलने]] घेतली आहेत.
* इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसर्‍या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रा. [[द.सा.बोरकर]] यांनी भूषविले होते.
* १२व्या संमेलनाच्या अध्यक्षा अंजनाबाई होत्या.
* १८वे झाडीबोली साहित्य संमेलन - १९-२० डिसेंबर २०१०. बोंडगावदेवी (गोंदिया जिल्हा) येथे.
* १९वे, २४-२५ डिसेंबर २०११, भजेपार (अंजोरा) येथे; अध्यक्ष कवी व कथाकार राम महाजन
* २०वे झाडीबोली संमेलन, ७-८ जानेवारी २०१३, नवेबांधगाव (गोंदिया) येथे; अध्यक्ष : नीलकंठ रणदिवे
* २१वे झाडीबोली साहित्य संमेलन : ११-१२ जानेवारी २०१४, आसगाव तर्फे पवनी येथे, ,अध्यक्ष बापूरावजी टोंगे
* २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले