"पद्माकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पद्माकर शंकर कुलकर्णी (जन्म : १९३३; मृत्यू : चिंचवड, ६ जानेवारी, २०१...
(काही फरक नाही)

२३:२६, ९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

पद्माकर शंकर कुलकर्णी (जन्म : १९३३; मृत्यू : चिंचवड, ६ जानेवारी, २०१५) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात.

वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान

आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम केले व अनेक शिष्य व चांगले कलाकार घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये वार्षिक संगीत महोत्सव सुरू केला. या महो्त्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.


(अपूर्ण)