"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
उत्तरी भारतीयांत पाळण्यातल्या नावाचे दोन किंवा तीन तुकडे करून पूर्ण नाव बनते. उदा० हरि वंश राय बच्चन. यांतले बच्चन हे काव्यरचनेसाठी घेतले टोपणनाव आणि हरिवंशराय हे पाळण्यातले नाव. त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव वापरलेच नाही. त्यांच्या मुलानेही तेच केले. त्याने अमिताभ बच्चन असे नाव धारण केले. त्यामुळे मूळची ऐश्वर्या याय असलेली सून, ऐश्वर्या राय बच्चन झाली. लाल बहादुर शास्त्री श्रीवास्तव. यांच्या नावातली शास्त्री ही पदवी, श्रीवास्तव हे आडनाव आणि लाल बहादुर हे व्यक्तिनाव. लालबहादुर शास्त्री यांची मुले आता ’शास्त्री’ हेच आडनाव लावतात. जगदीशचंद्र बोस हे नाव J.C. Bose असे, तर श्रीधरलाल हे नाव S,D. Lal असे लिहितात.
 
अनेक भारतीय आपल्या जातीचे नाव आडनाव म्हणून वापरतात. सोनार, कुंभार, भट, भट्ट, अय्यर, नायर, आगरवाल (अग्रवाल), वगैरे. पंजाबी शीख आणि अनेक दक्षिणी भारतीय आपल्या खेड्याचे नाव आडनाव म्हणून वापरतात. उदा० लढ्ढा. महाराष्ट्रात गावाच्या नावानंतर कर किंवा वार लावून आडनाव बनते. उदा० मुळगावकर, हमपल्लीवार वगैरे. पारशी किंवा बोहरी लोकांनी गावाच्या नावानंतर ’वाला’ लावून आपले आडनाव बनवले आहे. नडियादवाला, कोलंबोवाला ही त्याची उदाहरणे. राजस्थानात ’इया’ प्रत्यय लावून आडनावे बनतात. कटारा गावचा माणूस आपले आडनाव कटारिया सांगतो. व्यवसायाच्या नावाला आडनाव लावूनही आडनावे बनतात. बंदुकीचा व्यवसाय करणारा बंदूकवाला, दारूचा व्यवसाय करणारा दारूवाला, सोड्याच्या बाटल्यांचे ओपनर बनवणारा तो सोडाबॉटलओपनरवाला, वगैरे. काही आडनावे पूर्वजांचे वैशिष्ट्य सांगतात. द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, पुरोहित, उपाध्याय, वंद्योपाध्याय, मुखोपाध्याय वगैरे. अनेक उत्तरी भारतीयांत नावातला सिंह हा शब्द Singh, सिंग, सिन्हा, वगैरे बनून आडनाव बनतो. उदा० मिल्खासिंह हा मिल्खा सिंग होतो. असेच शत्रुघ्न सिन्हा, राजनाथ सिंह वगैरे.
 
==व्यवहारातले नाव==