"सोनिया परचुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

कथक नृत्यांगना
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आ...
(काही फरक नाही)

१२:०६, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री आहेत. भारतीय नृत्यशैली, विशेषतः कथ्थक या नृत्यप्रकारात त्या वाकबगार आहेत.

वयाच्या सहाव्या वर्षी सोनिया परचुरे यांनी नृत्यगुरू पूनम मुरडेश्वर यांच्याकडे नाच शिकायला सुरुवात केली. सोनिया परचुरे यांनी कथ्थक गुरू आणि गोपी कृष्ण यांच्या शिष्या डॉ. मंजिरी देव यांच्याकडे १५ वेषे कथ्थकचे कठोर प्रशिक्षण घेतले. गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्यविशारद आणि नृत्यालंकार या दोनही परीक्षात त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून ’लयकारी’चे प्रशिक्षण घेतले.

संस्थास्थापन

सोनिया परचुरे यांनी मुंबईच्या माहीम या उपनगरात, १९९५ साली, शरयू नृत्य कलामंदिर या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देणारी ते एक नामवंत ठिकाण आहे. तेथे कथ्थकमधले एकूणएक बारकावे शिकवले जातात.

अभिनय

सोनिया परचुरे या एक नाट्य‍अभिनेत्रीसुद्धा आहेत. ’सावळ अंधाराचा’,”प्रेमाच्या गावा जावे’, ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकांत त्यांच्या भूमिका होत्या. ’आक्का’नावाच्या चित्रपटांतली सोनिया परचुरे यांचे काम समीक्षकांना आणि प्रेक्षकांनी खूप वाखाणले.