"पाटेश्वर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
 
या लेण्यांत मानव व बैल यांची एकत्रित अशी "अग्नि-वृष"ची अप्रतिम मूर्ती आहे. या मूर्तीला ७ हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते तर बाजूने पाहिल्यास चेहर्‍यात नंदी(बैल) दिसतो. हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नागपुडीसारख्या दिसतात. या "अग्नि-वृष" मूर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबद्धता, व शिल्पकाराची कल्पकता अद्‌भुत आहे.
 
५. बळिभद्र लेण्यानंतर वर्‍हाडघर हा ३ लेण्यांचा समूह आहे. त्यातील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात पार्वतीची मूर्ती व बाजूला ९७२ शिवलिंगे कोरलेली आहेत. ९७२ ही संख्या देवीची १०८ शक्तिपीठे व प्रत्येक पीठाची ९ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात विष्णूची मूर्ती व बाजूला १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. १००० ही संख्या विष्णूच्या हजार नावांचे प्रतीक आहे.
 
याच दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात सूर्याची मूर्ती व बाजूला पुन्हा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत.
 
याशिवाय लेण्यांत भालचंद्र शिवाची व ब्रम्हदेवाची मूर्ती कोरलेली आहे. याच लेण्यांमध्ये एके ठिकाणी शंकराच्या पिंडीऐवजी २ कुंभ कोरलेले आहेत. याचबरोबर एकमुखी, चतुर्मुखी, सहस्रमुखी अशा अनेक प्रकारातली शिवलिंगेही कोरलेली आहेत.
 
याशिवाय या लेण्यांत काळसर्पाचे शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहेत, परंतु पुसट झाल्यामुळे हे शिलालेख वाचता येत नाहीत.