"पाटेश्वर लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १३:
 
३. पुष्करणी जवळूनच पायर्‍यांचा मार्ग पाटेश्वर मंदिराकडे जातो. या मार्गावर २ शिवलिंगे आहेत. यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत. तर दुसर्‍या शिवलिंगावर मध्यभागी मुख्य शिवलिंगावर दाढी, मिशा असलेला शंकर कोरलेला आहे आणि बाजूने ७१ दंडगोलाकार शिवलिंगे कोरलेली आहेत.
 
४. या पाटेश्वराच्या मंदिरानंतर पुढे ५ लेण्यांचा गट असलेले "बळिभद्र मंदिर लेणे" आहे. यात एक ठिकाणी शिवपिंडीच्या बाजूने चक्र, बदाम, गोल इत्यादी आकारात दहा आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यातील ८ आकृत्या आठ दिशा व २ आकृत्या सूर्य व चंद्र यांची प्रतीके आहेत. यशिवाय या लेण्यात दशवतार, अष्ट्मातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशाही विष्णू, महिषासूरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा इत्यादी शिल्पेही पहायला मिळतात.
 
या लेण्यांत मानव व बैल यांची एकत्रित अशी "अग्नि-वृष"ची अप्रतिम मूर्ती आहे. या मूर्तीला ७ हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते तर बाजूने पाहिल्यास चेहर्‍यात नंदी(बैल) दिसतो. हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नागपुडीसारख्या दिसतात. या "अग्नि-वृष" मूर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबद्धता, व शिल्पकाराची कल्पकता कौत्कास्पद आहे.