"केव नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: केव नदी ही रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [...
(काही फरक नाही)

१०:३३, २९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

केव नदी ही रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.