"ज.के. उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जयकृष्ण केशव उपाध्ये''' ([[३० मे]], [[इ.स. १८८६]]:[[नागपूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - [[१ सप्टेंबर]], [[इ.स. १९३७]]:नागपूर) हे एक मराठी कवी होते. त्यांनी [[उमर खय्याम]] यांच्या [[फारसी]] [[रुबाई|रुबायांचे]] मराठी अनुवाद केले आहेत.
 
उपाध्ये यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या २३व्या वर्षी वर्ढ्याजवळच्यावर्ध्याजवळच्या [[हनुमानगड]] येथे जाऊन त्यांनी तीन वर्षे रामाचा जप केला होता. तीर्थयात्रा करीत त्यांनी बरेच देशभ्रमण केले. पत्‍नी आणि मुलीच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना एकाकीपण आणि उदासीनता प्राप्त झाली होती. अशा वृत्तीमुळे लोक त्यांना ''बुवा'' म्हणून ओळखत.
 
==काव्यलेखन==
उपाध्ये यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कविता करायला प्रारंभ केला. विषयांची विविधता आणि श्लेषयुक्त सफाईदार रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. त्यांच्या काव्यांत शृंगार, विनोद, विडंबन, स्वधर्मप्रेम व राष्ट्रभक्ती हे सर्व आढळते. ’श्रीरामराज्याभिषेक’, ’जगन्मोहिनी’, ’अहिल्याकृत रामस्तुती’, ’द्रौपदीचा धावा’ या त्यांच्या भक्तिपर कविता. पत्‍नी व मुलीच्या निधनाचे दुःख अत्यंत आर्त गीतातून व्यक्त करणारी ’आता मला न माझी’ ही कविताही त्यांचीच. ’चहाटळपणा’, ’कविते करिन तुला मी ठार’ ’चालचलाऊ गीता’, ’बावळट बाळू’ यांसारख्या विनोदी आणि विडंबनात्मक कविताही त्यांनी लिहिल्या.
 
’वागीश्वरी’, ’विहंगम’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या उपाध्ये यांच्या काही कविता कोणत्याही पुस्तकांत समाविष्ट होऊ शकल्या नाहीत. जाहीर कवितागायन करणारे नागपूर भागातील आद्य प्रवर्तक म्हणूनही ज.के. उपाध्ये ओळखले जातात. कवी [[राजा बढे]] हे त्यांचे शिष्य होते.
 
==ज.के. उपाध्ये यांचे काव्यग्रंथ==
* [[उमरखय्याम]]च्या [[रुबाई|रुबाया]] व घटचर्चा :फिट्झेराल्डच्या इंग्रजी अनुवादावरून मंदाक्रांता वृत्तात केलेले [[रुबाई|रुबायांचे]] रसाळ रूपांतर
* पोपटपंची (१९२९). हा [[इ.स. १९०९]] ते १९२९ या कालखंडात लिहिलेल्या कवितांपैकी निवडक ४३ कवितांचा संग्रह आहे.
* गीतराघव : संस्कृत कवी [[जयदेव]] याच्या [[गीतगोविंद]]ाच्या धर्तीवरील काव्य
* पोपटपंची (१९२९). : हा [[इ.स. १९०९]] ते १९२९ या कालखंडात उपाध्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी निवडक ४३ कवितांचा संग्रह आहे.
* श्रीलोकमान्यचरितामृत : [[लोकमान्य टिळक]] यांच्यावरील भक्तिभावाने रचलेले ओवीबद्ध दीर्घकाव्य
 
 
 
 
 
{{DEFAULTSORT:उपाध्ये, ज.के.}}