"दयाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दयाळ (Oriental Magpie-Robin) या पक्ष्याचा म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
नपुंसकलिंगी नावे :- बांडा पाखरू
 
अन्य भाषांतील नावे :- काली सुई चिडिया, ग्वालिन, दयाल, दहंगल, दहिंगल, दहियर, दहियल, दोयल, महरी (सर्व हिंदी); अश्वक, अश्वकश्रीवद्‌, अश्वाख्य, करेटु, कालकंठ कलविंग, दध्यंक, दाधिक, नीलकंठ, भारत दध्यंक, श्रीवद्‌ पक्षी (सर्व संस्कृत); दैयड (गुजराथी); पेद्द नलंचि, सरल गाडु (दोन्ही तेलुगू); उब्बेकुळ्ळ सुव्वि, मडिवाळ सुव्वि, मडिवाळ हक्कि (सर्व कानडी); गुंडू करिच्चान्‌, राबिन्‌ (दोन्ही तामीळ).
 
दाधिक या संस्कृत शब्द अर्थ दही विकणारा. अंगावर दही सांडल्यासारखे डाग असलेला हा पक्षी, म्हणून याचे नाव दाधिक किंवा दध्यंक. दयाळ, दहीगोल, दहेंडी हे शब्द दधीवरून आले. अश्व म्हणजे घोडा. हा पक्षी घोड्यासारखी शेपटी उडवतो, म्हणून याचे नाव अश्वक, अश्वाख्य वगैरे. काळ्या रंगाचा असल्याने कॉप्सिकस, काबरो, कालाचिडी, कालो करालो, काळचिडी ही नावे.
 
 
राजस्थानचा रखरखीत प्रदेश सोडून भारतात दयाळ सगळीकडे आढळतो. डोंगराळ भागात १,२२० मीटर उंचीपर्यंत तो सापडतो. झाडीत राहणारा असल्यामुळे तो झाडांच्या राईत आणि बागांत असतो. गावात आणि खेड्यापाड्यांत तो नेहमी दिसतो.
Line १४ ⟶ १७:
 
दयाळ हा गाणारा पक्षी आहे. मधुर आणि लांबलचक शीळ घातल्यासारखे याचे गाणे असते. सकाळी व तिसर्‍या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो.
 
पहा : [[प्राण्यांचे आवाज]]
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दयाळ" पासून हुडकले