"प्राण्यांचे आवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==प्राण्यांचे आवाज== * कावळा - कावकाव * कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरग...
(काही फरक नाही)

१७:२४, २५ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

प्राण्यांचे आवाज

  • कावळा - कावकाव
  • कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरगुर
  • कोकिळा - गाणे
  • कोल्हा - कोल्हेकुई
  • कोंबडा - आरवणे, कुकूचकू करणे
  • कोंबडी - पकपक, पक पक पकाक पक
  • गाढव - खिंकाळी, ओरडणे, रेंकणे
  • गाय-बैल-म्हैस - हंबरणे
  • घोडा - खिंकाळी, फुरफुर
  • चिमणी - चिवचिव
  • डास - गुणगुणणे
  • डुक्कर - घुरघुरणे, गुरगुरणे
  • तरस - हसणे
  • दयाळ - गाणे
  • पारवा - घुमणे, गुटरगूं
  • बदक : पकपक
  • बुलबुल - गाणे
  • बेडूक - डराव डराव
  • बैल, रेडा - डुरकणे
  • भुंगा - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन
  • मांजर - म्यावम्याव
  • मालगाडीचे इंजिन - रें रें
  • माशी - घोंघावणे
  • मूल - आक्रंदन, आक्रोश, आरोळी, ओरडणे, किंचाळी, टाहो, बोंब, मुसमुस, हंबरडा,
  • मैना - गाणे
  • मोर - टाहो किंवा केका
  • वाघ - डरकाळी
  • शेळी-मेंढी - बें बें
  • समुद्र - गाज
  • सर्दीचे नाक - सूं सूं, फर्रकन (शिंकरणे)
  • साप, नाग - फुस्स करणे, फिसकारणे
  • सिंह - गर्जना
  • हत्ती - चीत्कार

वाहनांचे आवाज

  • आगगाडी - झुकझुक, धाड धाड
  • आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
  • घाट चढणारा ट्रक - रें रें
  • मोटार = पों पों करणे, पम्‌ पम्‌ करणे, पीप पीप करणे

==अन्य आवाज

  • धबधबा - धो धो
  • पाऊस - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
  • वारा - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
  • शिपायाची शिट्टी - फुर्र