"कॉम्रेड शरद पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
कॉम्रेड शरद पाटील हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्षाचे [[धुळे]] जिल्ह्याचे संघटक होते. ब्राह्मणेतर चळवळीशी संबद्ध असलेल्या घराण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या शरद् पाटलांना त्या चळवळीची व्याप्ती जातीय समतेपुरतीच असल्याचे वाटल्याने पाटील समतेसाठी व्यापक वर्गलढा उभारणार्‍या कम्युनिस्ट पक्षाकडे आकृष्ट झाले. पण तेथे वर्गविषमतेवर अधिक भर दिला जाऊन जातीय विषमतेकडे दुर्लक्ष होते, असा अनुभव आल्यावर ते साम्यवादी चळवळीत जाति‍अंताची भाषा बोलू लागले. दरम्यान, त्यांना स्त्री-पुरुष, म्हणजेच लिंगविषमतेच्या समस्येचीही जाणीव होऊन त्यांनी वर्ग आणि जाती यांच्या अंताबरोबरच स्त्रीदास्यंताची चळवळही व्हायला हवी असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना मार्क्‍सवाद्यांनी केलेल्या आदिम समाजाच्या विश्लेषणाला आव्हान द्यावे लागले. पण मार्क्‍सवादी विज्ञानाच्या चौकटीत जातीच्या आणि लिंगविषमतेच्या भाषेला थारा नाही, हे लक्षात आल्याने पाटील मार्क्‍सवाद्यांवर वर्गाधळेपणाचा आरोप करीत, वेगळे विश्लेषण करू लागले. परिणामी त्यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी झाली. त्यानंतर शरद पाटलांनी इ.स. १९७८साली, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची धोरणे [[कार्ल मार्क्स]], [[बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[जोतिबा फुले]] यांच्या विचारसणीवर आधारित आहेत. (निदान) २००९ सालापर्यंत शरद पाटील या पक्षाचे अध्यक्ष होते.
 
अशी विचारसरणी असलेले शरद पाटील अचानक, स्वैराचारी म्हणून बदनाम ठरलेल्या [[शाक्त]] तंत्राकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले. [[शाक्त]] तंत्र त्यांना जाती आणि स्त्रीदास्य यांचा अंत घडवून आणणारा विज्ञानपूर्व मार्ग वाटला. शाक्तांच्या उपासनेत मद्यमांसमैथुनादी पंच मकारांवर भर दिला जातो. पाटलांनी त्यातील मैथुनावर लक्ष केंद्रित केले. शाक्तपंथाने उच्चवर्णीय पुरुषाने तथाकथित नीच जातीच्या स्त्रीबरोबर संबंध ठेवायला नुसती मुभाच नव्हे तर उत्तेजन दिले. तो त्यांच्या धार्मिक विधीचा मुख्य भाग होता. शरद पाटलांना हा एक जातिमुक्त समाजाचा प्रयोगच वाटला. ब्राह्मण पुरुषाने अस्पृश्य स्त्रीशी अशा प्रकारचा संबंध ठेवणे हे एक मोठेच क्रांतिकारक पाऊल असल्याचे त्यांना वाटले.
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]