"भारतीय बँका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

व्यापारी बॅका
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इ.स. २०१४ सालच्या मोजणीनुसार, भारतामधील व्यावसायिक बँकांची एकूण...
(काही फरक नाही)

१७:२५, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

इ.स. २०१४ सालच्या मोजणीनुसार, भारतामधील व्यावसायिक बँकांची एकूण संख्या १६७ आहे व त्यांच्या शाखांची संख्या ८८ हजारांच्या आसपास जाते. इतक्या सगळ्या बँकांत काम करणार्‍यांची संख्या आठ लाखांहून थोडी अधिक आहे.

या तुलनेत चीनमधल्या व्यावसायिक बँकांची संख्या २५०, आणि बँकिंग सेवा देणार्‍या संस्थांची संख्या ३,७६९ इतकी आहे. या सगळ्या संस्थांच्या चीनमधल्या एकूण एक लाख ९६ हजार इतक्या शाखांमध्ये ३० लाख कर्मचारी काम करतात.

जगभरातल्या सर्वात मोठ्या १०० बँका घेतल्या, तर त्यात एकट्या चीनमधल्या ११ बँका आहेत, त्याही अगदी सुरुवातीच्या क्रमांकांवर. या यादीत भारतातल्या तीन बँका आहेत, मात्र त्या यादीत शेवटी शेवटी येतात. इंडस्ट्रियल अॅन्ड कमर्शियल बँक ऑफ चायना ही चीनमधली सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही तिची भारतातील प्रतिस्पर्धी बँक आहे. चीनच्या इंडस्ट्रियल अॅन्ड कमर्शियल बँकेचा व्यवसायाकार आहे २०,१०० कोटी डॉलर इतका. त्या तुलनेत भारतातील स्टेट बँकेचा व्यवसाय ४,००० कोटी डॉलर इतकाच आहे.