"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल्पाकृतींची सरकारी कामे मिळविण्यासाठी त्यांना दिल्लीत राहणे गरजेचे होते. त्यांचा स्टुडिओ कल्याणमध्ये व फाउंडरी डोंबिवलीत होती.
 
नेत्राच्या आईने कन्येला संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, साहित्य या सगळ्यांचीच गोडी लावली. लग्नाअगोदर मुंबईत असताना नेत्रा संस्कृत नाटकांतून अभिनय करीत असत. [[अभिज्ञान शाकुंतल]] आणि [[मृच्छकटिकम्‌]] या नाटकांतून त्यांनी [[दाजी भाटवडेकर]] यांच्या दिग्दर्शनाखाली अनुक्रमे प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या. त्याच्या रूपाची, भूमिकेची आणि अभिनयकौशल्याची तत्कालीन वृत्तपत्रांतून दखल घेतली गेली होती.
 
==दिल्लीतील नाट्यविषयक कार्यक्रम==
नेत्रा कृष्णराव केतकर लग्नानंतर नेत्रा सदाशिव साठे झाल्या. पती सदाशिव साठे हे स्वतः जागतिक कीर्तीचे शिल्पकार होते. लग्नानंतर दिल्लीत आल्यावर नेत्रा साठे यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळात स्व्तःची विशेष ओळख करून घेतली. त्यांनी मंडळासाठी नाटके लिहिली, नाटके बसवली आणि नाटकांतून कामेही केली. त्यांनी लिहिलेल्या एकां्किकेतील’एक बिचारी व्यथा’ ही विनोदी एकांकिका विशेष गाजली, तर ’नियती’ या गंभीर विषयावरील एकांकिकेला पहिले बक्षीस मिळाले.
 
दिल्लीच्या गणेशोत्सवासाठी नेत्रा साठेंनी ’सौभद्रकल्लोळ’ नावाची एकांकिका बसवली. सौभद्र आणि संशयकल्लोळ या नाटकांतील पदांवर आधारलेलीही व मुलांसाठी लिहिलेली ही नाटिका, त्यांतील नाट्यगीतांमुळे विशेष गाजली. या नाटिकेचे सुमारे ५ प्रयोग दिल्लीत झाले.
 
बालगंधर्वांना वाहिलेल्या एका श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात नेत्रा साठे यांनी तरुण वयातल्या बालगंधर्वांसारखी वेशभूषा करून बालगंधर्वांच्या लकबींसकट त्यांची नाट्यगीते प्रस्तुत केली होती.