"अनंत अंतरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
==वाचनाची आवड==
इंग्लिश-मराठी साहित्य हा अनंतरावांचा श्वास होता. अभिजात चित्रपट हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. इंग्लिश-मराठी समीक्षावाङ्मयाचे सातत्यानं परिशीलन करणं हा त्यांचा ध्यास होता. विविध लेखकांच्या शैलीचा वेध घेणं आणि त्यावर चिंतन करणं हा त्यांचा स्वभावधर्म होता. बागकाम करणे हा त्यांचा विरंगुळा होता. नाटक, सर्कस आणि जादूचे प्रयोग याबद्दल त्यांच्या मनात एक विलक्षण ओढ होती. इंग्लिश-मराठीतील दुर्मीळ आणि अभिजात ग्रंथांचा संग्रह त्यांच्याकडे होता.आपली दर्जेदार नियतकालिके आणि साहित्यिक परिवार हीच त्यांची संपत्ती होती. अशा विविध पैलूंचा धनी असणार्‍या अनंतरावांकडे जाहिरातदारांच्या मनमानीला झुगारून टाकण्याची जिद्द होती. त्यांच्या संपादनकौशल्यानं मराठी साहित्य अधिकच समृद्ध केलं.
 
 
 
 
==संपादनकौशल्य==
अनंत अंतरकरांच्या संपादनकौशल्याने मराठी साहित्य अधिकच समृद्ध झाले. प्रसिद्ध लेखक [[पु.भा. भावे]] म्हणत, 'हंस लेखकाच्या नावांवर नाही, तर संपादकाच्या नावावर चालतो. अंतरकर लेखक घडविणारे संपादक आहेत. असे संपादक विरळाच असतात.'