"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
==बालपण==
गीता साने या लहानपणापासूनच फार बंडखोर होत्या. त्या सहसा कुणाला वेणी घालू देत नसत. खूप घट्ट वेणी घालून केस दुखतात म्हणून. तसेच, फार कढत पाणी घालतात म्हणून न्हायला घातलेले त्यांना आवडत नसे. झाडावर, अंगणाच्या पावसाने विरघळू शकेल अश्या कच्च्या भिंतीवर चढणे हे आवडते उद्योग.
 
गीता साधारण चार वर्षांची असताना वडिलांनी मराठी वर्णमाला आणून भिंतीवर लावली होती. तिला खांद्यावर घेऊन ते अक्षरे दाखवीत. शाळेत जायच्या आधीच तिला चांगले वाचता येऊ लागले. आकड्यांची ओळखदेखील अर्थात झाली.
 
गीताला भाऊंनी सहाव्या वर्षी शाळेत घातले. ती मिशनरींची शाळा, गावाबाहेर होती. बैलगाडीने जावे लागे. गीताला शाळा आवडली. तरी एक दिवस ती रडत घरी आली. आईने विचारले तेव्हा सांगितले की तिला वर्गातून काढून दुसरीकडे बसवले. मारकुट्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिक्षकांनी केलेली ही शिक्षा कशासाठी केली ते तिला कळले नव्हते. भाऊसाहेब कोर्टातून आले. हळूच गोदावरीबाईंनी गीता रडत आल्याचे त्यांना सांगितले. ते पुन्हा कोट टोपी घालून मास्तरांच्या घरी गेले. तिथे त्यांना समजले की गीताला डबल प्रमोशन - एक इयत्ता गाळून पुढल्या वर्गात प्रवेश मिळाला होता. नवी पुस्तके घेऊन वडील घरी आले आणि गीताचे रडे मावळले.
 
==हिंगण्याचे शिक्षण==
१९२० साली गीताच्या वडिलांनी गीता-सीताला हिंगण्यास ठेवण्याचे ठरवले. प्रवास वेळखाऊ व त्रासदायक होता. वाशीम ते अकोला बस; पुढे मुुंबईची आगगाडी व कल्याणला उतरून पुणे व पुढे टांग्याने हिंगणे. गीता-सीताला प्रत्येकी दोन परकर, एक पोलके व एक गाठीची चोळी त्यांच्या आईने हातात शिवून दिली. जमेल तेव्हा आणखी एकेक पोलके शिवायचे कबूल केले. रात्री पोलके धुवून वाळत घालायचे व चोळी वापरायची, सकाळी पुन्हा तेच पोलके घालायचे. सहा महिन्यांनी गोदावरीबाई आणखी एकेक पोलके शिवू शकल्या. तोवर पहिली विरली होती.
 
हिंगण्याला एक वेगळेच विश्व गीताला दिसले. तिथल्या मोकळया वातावरणाची छाप कायम तिच्या मनावर बसली.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गीता_साने" पासून हुडकले