"गीता साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गीता जनार्दन साने (जन्म : वाशीम, ३ सप्टेंबर १९०७; मृत्यू : १२ सप्टें...
(काही फरक नाही)

१८:१८, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

गीता जनार्दन साने (जन्म : वाशीम, ३ सप्टेंबर १९०७; मृत्यू : १२ सप्टेंबर १९९१) या मराठीतील एक बंडखोर कादंबरीकार होत्या.

त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांचे विषय हे भारतीय कुटुंबसंस्थेतील दोष, त्यांच्या मर्यादा आणि त्यात स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटीसंदर्भातील होते. स्त्रीच्या अंत:करणातील स्वातंत्र्याच्या ऊर्मीची जाणीव साने यांनी आपल्या कादंबर्‍यांतून सातत्याने प्रकट केल्यामुळे त्या तत्कालीन काळात बंडखोर ठरल्या.

आई-वडील

गीता साने यांच्या आईचे नाव भागीरथी जनार्दन साने. पण तिला माहेरच्या नावाने, गोदावरी म्हणून ओळखत. गीताचा जन्म झाला तेव्हा तिची आई २३ वर्षांची आणि वडील २८ वर्षांचे होते. आईची गीताच्या अगोदरची तीन मुले बालपणीच दगावली होती. वडील जनार्दन भालचंद्र साने. त्यांना घरात भाऊ व बाहेर भाऊसाहेब म्हणत. त्यांना भगवद्‌गीता फार प्रिय म्हणून या कन्येचे नाव गीता ठेवले. त्यावेळी वडील शिकत होते. घरची गरिबी, पदरी बायको, विधवा आई. म्हणून एक वर्ष नोकरी करायची, एक वर्ष शिकायचे असे करून बारा वर्षांत बी.ए. एल्एल.बी. झाले. त्यांचे शिक्षण मुंबईला विल्सन, पुण्याला फर्ग्युसन, बडोदा व नागपूरच्या कॉलेजांत झाले. गीताची धाकटी बहीण सीता सहा महिन्यांची असताना जनार्दनपंत वाशीमला स्थायिक झाले.


(अपूर्ण)