"कृष्णा सोबती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय हिंदी लेखिका
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कृष्णा सोबती (जन्म : पाकिस्तानातले गुजरात शहर, १८ फेब्रुवारी १९२५...
(काही फरक नाही)

२३:३५, २५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

कृष्णा सोबती (जन्म : पाकिस्तानातले गुजरात शहर, १८ फेब्रुवारी १९२५) या एक हिंदी भाषेतील लेखिका आहेत. इ.स. १९५०साली त्यांची पहिली कादंबरी ’लामा’, प्रकाशित झाली.

अतिशय थेट आणि धीट लिखाणासाठी त्या प्रसिद्ध आहेत.. त्यांच्या लिखाणातून पंजाबच्या संस्कृतीची, राहणीची, परंपरांची आणि चालीरीतींची खर्‍या अर्थाने ओळख होते. १८व्या किंवा १९व्या शतकांतील पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि लोकरीतीची माहिती करून घ्यायची असेल तर कृष्णा सोबती यांची ’जिंद्गीनामा’ वाचावी.

कृष्णा सोबती यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऐ लड़की
  • ज़िन्दगीनामा (कादंबरी)
  • डार से बिछुड़ी (कादंबरी)
  • तीन पहाड़( कादंबरी)
  • दादी अम्मा (कथासंग्रह)
  • दिलो-दानिश (कादंबरी)
  • बादलों के घेरे (कथासंग्रह)
  • मित्रो मरजानी (कथासंग्रह)
  • बादलों के घेरे (कथासंग्रह)
  • मेरी माँ कहाँ (कथासंग्रह)
  • यारों के यार (कादंबरी)
  • समय सरगम (कादंबरी)
  • दादी अम्मा (कथासंग्रह)
  • सिक़्क़ा बदल गया (कथासंग्रह)
  • सूरजमुखी अंधेरे के (कादंबरी)
  • हम हशमत (भाग १ आणि २)

टीका

कृष्णा सोबती यांच्या धीट लिखाणावर भरपूर टीका होत राहिल्या. एक स्त्री असूनसुद्धा त्या असे लिखाण कसे करू शकतात यासाठी त्यांना अनेक साहित्यिकांचा रोष पत्करावा लागला.

कृष्णा सोबती यांना मिळालेले साहित्यिक पुरस्कार

  • कथा चूड़ामणि पुरस्कार (१९९९)
  • मैथिलीशरण गुप्त पुरस्कार
  • शलाका सन्मान (२०००-२००१)
  • साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०)
  • साहित्य अकादमी फ़ेलोशिप (१९९६)
  • साहित्य शिरोमणि पुरस्कार (१९८१)
  • हिन्दी अकादमी अॅवॉर्ड (१९८२)