"निंबा कृष्ण ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
==उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मालमत्ता==
सहा वर्षे कुलगुरूपदावर राहून एन.के. ठाकरे १९९६साली निवृत्त झाले. त्यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गंगाजळी १४ कोटी रुपयांची होती; शिवाय प्रशस्त व देखण्या ४० इमारती विद्यापीठात उभ्या होत्या. सुमारे ५ लाख झाडांनी व जागोजागीच्या हिरवळीने वेढलेले आणि वेरुळ-अजिंठा येथील लेण्यांच्या चित्रांनी नटलेलेलं हे विद्यापीठ आज 'पर्वतावरील ज्ञानशिल्प' म्हणून ओळखले जाते.
 
==उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकारी==
शिपायापासून रजिस्ट्रारपर्यंतच्या जागांसाठीच्या निवड प्रक्रियेसाठी एन.के. ठाकरे स्व्तः
 
प्रश्नपत्रिका काढत. नेमणुकांच्या वेळी सत्तेतील राजकारण्यांच्या आदेशाला 'गुणवत्ता
 
असेल तर न्याय मिळेल' असं रोखठोक सांगण्याची निर्भयता त्यांच्यात होती. ठाकर्‍यांनी
 
आपल्या सहकार्‍यांना आपल्या वागण्यातून कर्तव्यकठोरतेचे धडे दिले.
 
==निवृत्तीनंतर==
१९९६नंतर एन.के. ठाकरे पुणे विद्यापीठात आलेआणि १९९८पर्यंत राहिले. या काळातल्या
त्यांच्या कामाने आणि संशोधनाने दिल्लीच्या युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्‍स कमिशनने पुणे
विद्यापीठाच्या गणित विभागाला 'गणितातील प्रगत शिक्षण देणारे केंद्र' हा दर्जा प्रदान
केला.
 
पुणे विद्यापीठातून बाहेर पडल्यावर ठाकरे आपल्या मोराणे गावी आले. वाट्याला आलेल्या
वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी
इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. त्यासाठी धुळे व पुणे येथील स्वतःची दोन घरे विकली,
शिवाय आपला फंड आणि आयुष्यभराची बचत या कामात ओतली आणि उराशी जपलेले
स्वप्न साकार केले.
 
आपल्या आईवडिलांच्या नावे (शेवंता प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल व कृष्ण हायस्कूल)
एन.के. ठाकर्‍यांनी सुरू केलेली दोन हजार हिरव्यागार झाडांनी नटलेली ती स्वच्छ, सुंदर,
आणि प्रशस्त शाळा बघताना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. सर्वात
कमी फी आकारणारी धुळ्यातील दर्जेदार शाळा असा या शाळेचा लौकिक आहे.
 
==पुरस्कार==