"निंबा कृष्ण ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
 
==शैक्षणिक कारकीर्द==
[[ग.प्र. प्रधान|ग.प्र. प्रधानांचा]] आदर्श समोर असल्याने, शिक्षण क्षेत्रातच काम करायचे ठाकरे यांनी ठरवले. घरची खूप शेती होती. दूधदुभत्याला कमी नव्हते. पण रोख पैसा नसायचा, त्यामुळे एका शाळेत पूर्ण वेळ शिकवता-शिकवता ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्‌‍सी.. झाले. या परीक्षेत गणितात पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना मुंबईतील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली. पुढे मुंबईतीलच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मिठीबाई कॉलेज अशा नोकर्‍या करून एन.के. ठाकरे गोव्यातील चौगुले कॉलेजमध्ये लागले. अंती १९६९ पासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गणिताचे प्रोफेसरप्राध्यापक म्हणून रुजू झाले, आणि आठ वर्षांनी निवृत्त झाले..
 
 
 
 
कोल्हापूरच्या या नोकरीच्या काळात त्यांना गणितातली पीएच.डी. मिळाली. आठ वर्षांत त्यांचे गणितासंबंधीचे २००हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.
 
एन.के. ठाकरे सन १९८२ ते १९८५ या काळात धुळ्यातील जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर त्यांना पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे "टिळक प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे मानाचे पद मिळाले.
 
==जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ==
एन,के, ठाकरे १५ ऑगस्ट १९९० रोजी प्रस्तावित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे तीन जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार होते. १९९१-९२ हे या विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष. वर्ष सुरू झाले, तरी विद्यापीठाला स्वतःची जागा नव्हती. त्यासाठी जमीन मिळविण्यापासूनचे सर्व काम ठाकरे यांनी केले.. शेवटी जळगाव शहराजवळच्या एका डोंगरापलीकडील ६५० एकर टेकड्यांत व माळरानात या विद्यापीठासाठी इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतींत १९९५साली विद्यापीठाचे स्थानांतर झाले.
 
==पुरस्कार==